Breaking News : राजस्थानमध्येही भाजपचे धक्कातंत्र, वसुंधरा राजेंचा पत्ता कट करत ‘या’ नेत्याची मुख्यमंत्रीपदी लागणार वर्णी…


Breaking News : राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी आता भजनलाल शर्मा यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्येही भाजपने धक्कातंत्र कायम ठेवत मुख्यमंत्रिपदासाठी नवीन चेहऱ्यालाच पसंती दिली आहे.

तसेच राजस्थानमध्ये १९९ पैकी ११५ जागांवर विजय मिळवूनही भाजपाला मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करता आले नसल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणेच राजस्थानमध्ये भाजप धक्का देणार की चर्चेतील नावांवर शिक्कामोर्तब होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. Breaking News

सोमवारी झालेल्या आमदारांच्या बैठकीत वसुंधरा राजे शिंदेयांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. त्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

दरम्यान, भाजपने मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये सर्वांनाच धक्का दिला. मध्य प्रदेशात मोहन यादव व छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साय यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे.

ही दोन्ही नावांवर राजकीय वर्तुळात अजिबात चर्चा नव्हती. मात्र, आमदारांच्या बैठकीत अचानक ही नावे समोर आणत भाजपने राजकीय खेळी खेळली. हीच खेळी राजस्थानमध्ये भाजपने केली. पुन्हा एकदा भाजपचे धक्कातंत्र कायम असल्याचे दिसत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!