Breaking News : “…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू”, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा..


Breaking News : तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका घेतली.

तलाठी भरती परीक्षेचा निकाल ५ जानेवारी रोजी जाहीर झाला आहे. मात्र यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे आता तलाठी भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

तलाठी भरती परीक्षेमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप देखील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणी आता विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. Breaking News

काँग्रेस नेत्याने गैरव्यवहार झाल्याचे आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले वडेट्टीवार यांनी याप्रकरणी पुरावे सादर करावेत. जर खरे पुरावे मिळाले तर परीक्षा रद्द करण्यात येईल. अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. देवेंद्र फडणीस यांनी पुण्यातील नवीन भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.

तलाठी भरती परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता फडणवीस म्हणाले, तलाठी भरती परीक्षा राज्यात खूप पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आले आहे.

या परीक्षेमध्ये कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही दिल्यास त्याची चौकशी केली जाईल. पुरावे योग्य असल्या चौकशी करून ही परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कारवाई देखील केली जाईल, असे फडणवीस म्हणाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!