Breaking News : पुन्हा एकदा भीषण अपघात, भरधाव कार पुलावरून रेल्वे ट्रॅकवर कोसळली, तिघांचा जागीच मृत्यू

Breaking News : कर्जत-नेरळ मार्गावरून भयानक घटना समोर आली आहे. कर्जतहून नेरळच्या दिशेने निघालेली कार किरवली पुलावरून थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या मालगाडीने कारला जोरदार धडक दिली. या भयानक घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

हि धक्कादायक घटना मंगळवारी (ता. ७) पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. अपघातातील मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमुळे तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. Breaking News


मिळालेल्या माहिती नुसार, अपघातग्रस्त कार कर्जतहून नेरळच्या दिशेने जात होती. या कारमधून पाच ते सहा जण प्रवास करीत होते. दरम्यान, कार किरवली पुलाजवळ आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.
क्षणार्धात कार पुलावरून रेल्वे ट्रॅकवर कोसळली. त्याचवेळी पनवेल कर्जत रेल्वे मार्गावरून मालगाडी जात होती. या मालगाडीने कारला जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
