ब्रेकिंग! राष्ट्रवादी पक्ष पोरखा झाला, उपमुख्यमंत्री अजित पवारांच निधन; मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचे सर्व दौरे रद्द…


पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची सर्व दौरे रद्द केले आहेत.

आज सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास बारामधीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या सभांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीकडे येत होते. मुंबईहून ते बारामतीच्या दिशेनं रवाना झाले असतानाच बारामती विमानतळापासून नजीकच असताना साधारण 500 फूट उंच आभाळात असतानाच हे विमान कोसळलं आणि धुराचे लोट उठले. दरीमध्ये असणाऱ्या एका शेतात हे विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर निधनाची बातमी समजताच राष्ट्रवादी पक्षावर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेण मधील सभा त्यांची रद्द केली आहे.

बारामती विमानतळावर लॅंडिंग होत असताना हा अपघात झाला. अजित पवार यांचे काही पीए आणि बॉडीगार्ड या विमानात होते अशी माहिती मिळत आहे. या अपघाताची माहिती मिळताच अजित पवार यांचे निकटवर्तीय बारामती विमानतळाकडे जमत आहे.प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!