ब्रेकिंग! महापालिका निवडणूक लांबणीवर? उत्सुक उमेदवारांच्या उत्साहावर पाणी, अंतिम मतदार याद्यांच्या घोळाचा फटका?


मुंबई :आगामी महापालिका निवडणुकीवर पुन्हा वादळ घोंगावत आहे. महापालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे.राज्यातील29महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सध्या मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम आहे.दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी पाच दिवसाची मुदत वाढवली आहे.त्यानंतर निवडणूक पुढील आठवड्यात घोषीत होण्याची शक्यता आहे.

मुंबईतच लाखो दुबार मतदार सापडले असून मतदार याद्यांची पडताळणी झालेली नाही. अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. मतदार याद्या जाहीर करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर होती.. पण अजून निवडणूक याद्यांचा घोळच निस्तारलेला नसल्याने आणि मतदार यादी जाहीर करण्यासाठी अंतिम मुदत वाढवण्यात देण्यात आल्याने महापालिका निवडणूक पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महापालिकांच्या अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास 5 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने अखेरच्या टप्प्यात याविषयीचा आदेश दिला. मतदार याद्या जाहीर करण्यास उशीर होत असल्याने आणि त्यावर पुन्हा आक्षेप आणि हरकती आल्यास महापालिका निवडणूक कार्यक्रमात व्यत्यय येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

महापालिकांच्या मतदार याद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी ही मुदत वाढ देण्यात आली आहे. जर त्यानंतर राजकीय पक्षांनी तीव्र आक्षेप घेतल्यास अथवा काही उमेदवार या मतदार याद्यांमधील घोळाप्रकरणी न्यायालयात गेल्यास संभावित वेळापत्रक सुद्धा बाधित होण्याची भीती व्यक्त होत आहे.

       

महापालिका निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. महापालिकांच्या अंतिम मतदार याद्या जाहीर करण्याच्या वेळापत्रकातील बदलामुळे असा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.परिणामी आता डिसेंबर अखेर जिल्हा परिषद निवडणूक होण्याची शक्यता माळवली आहे. या निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!