ब्रेकिंग! बारामतीत शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवारांमध्ये बैठक; कोणत्या मुद्यांवर चर्चा?


बारामती :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. अशातच आता बारामतीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या बैठकीत राष्ट्रवादीच्या विलीनिकरणाची चर्चा पुढे सरकण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्येराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत स्वतंत्र बैठक पार पडली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार याची अशी इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. आता त्यांची सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडून ती इच्छा पूर्ण करण्याचं काम करण्यात येणार आहे. यां बैठकीत राष्ट्रवादीच्या विलीनिकरण यावर चर्चा झाली का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरणाच्या मुद्यावर शरद पवार म्हणाले की, “या सर्व चर्चेत फडणवीस कुठेच नव्हेत, त्यामुळे त्यांना याबाबत भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही. सध्या चर्चाच झाली नसताना त्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही. माझा उल्लेख का केला हे समजलं नाहीअसे त्यांनी म्हटले.

तसेच सुनेत्रा पवार यांच्या शपथविधिवर शरद पवार म्हणाले, सुनेत्रा पवार भेटायला आल्या तर त्यांना आनंदाने आशीर्वाद देईन, अशी प्रतिक्रिया यावेळेस त्यांनी दिली. तसेच सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला, संधी दिली आनंद आहे, असेही ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!