ब्रेकिंग! आरक्षणाची मर्यादा ओलंडणाऱ्या 57 नगरपरिषद आणि नगरपंचायतींची यादी समोर


पुणे : महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून 57 संस्थेमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावलीं आहे. त्यानंतर आता आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या 57 नगरपरिषद आणि नगरपंचायतची यादी समोर आली आहे.

आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 40 नगरपरिषदा

अ. क्र. जिल्हा नगर परिषदेचे/नगरपालिकेचे नाव
१ परभणी – पुर्णा
२ पालघर -जव्हार
३ भंडारा- साकोली शेणदुर्तफा
४ पुणे -दौंड
५ वर्धा -पुलगाव
६ अहिल्यानगर- शिर्डी
७ धुळे -पिंपळनेर
८ अमरावती -चिखलदरा
९ अमरावती- दर्यापूर
१० यवतमाळ -आर्णी
११ यवतमाळ -यवतमाळ
१२ नंदुरबार -नवापूर
१३ नंदुरबार -तलोडा
१४ गडचिरोली-अरमोरी
१५ गडचिरोली-देसाईगंज
१६ गडचिरोली -गडचिरोली
१७ नांदेड- बिलोली
१८ नांदेड- धर्माबाद
१९ नांदेड -कुंडलवाडी
२० नांदेड- उमारी
२१ चंद्रपूर -बल्लारपूर
२२ चंद्रपूर -भद्रावती
२३ चंद्रपूर -ब्रम्हपुरी
२४ चंद्रपूर- चिमूर
२५ चंद्रपूर -घुग्गुस
२६ चंद्रपूर- नागबीड
२७ चंद्रपूर -राजुरा
२८ नागपूर -बुटीबोरी
२९ नागपूर -डीगडोह
३० नागपूर -कामटी
३१ नागपूर -काटोल
३२ नागपूर -खापा
३३ नागपूर- उमरेड
३४ नागपूर -कन्हान पिपरी
३५ नागपूर -वाडी
३६ नाशिक -मनमाड
३७ नाशिक -पिंपळगाव बसवंत
३८ नाशिक -इगतपुरी
३९ नाशिक- ओझर
४० नाशिक- त्र्यंबक

आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या १७ नगरपंचायती
अ. क्र. जिल्हा नगर पंचायतीचे नाव

       

१ अमरावती -धारणी
२ वाशिम -मालेगाव
३ यवतमाळ -धानकी
४ पालघर- वाडा
५ चंद्रपूर- बैसी
६ धुळे -सिंदखेडा
७ गोंदिया- गोरेगाव
८ गोंदिया- सालेकसा
९ नागपूर- बेसा पिपळा
१० नागपूर -भीवापूर
११ नागपूर नाबीडगाव – तरोडा खुर्द पंढुर्णा
१२ नागपूर -गोधणी
१३ नागपूर -कांद्री
१४ नागपूर -महाधुला
१५ नागपूर- मौदा
१६ नागपूर -निलडोह
१७ नागपूर -येरखेडा

दरम्यान ही यादी राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सादर केली आहे. या ५७ संस्थांमध्ये निवडणुका होणार असल्या तरी त्यांचा अंतिम निकाल न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. येथे निवडून आलेले उमेदवार अंतिम निर्णय येईपर्यंत न्यायप्रविष्ट राहतील. या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!