ब्रेकिंग!लाडकींना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज ते…. ; महायुतीकडून निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा धडाका

मुंबई : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना प्रत्येक राजकीय पक्षांकडून मतदारांना प्रभावित करण्यासाठी विविध घोषणाबाजी केली जात आहे. अशातच आता महायुतीकडून आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये लाडक्या बहिणींना आता पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपाईचे नेते रामदास आठवले आणि महायुतीमधील घटक पक्षांनी एकत्र येत आज जाहीरनामा प्रसिद्ध केला.या जाहीरनाम्यात मुंबईतील लाडक्या बहिणींना लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, महिलांना बेस्ट प्रवासात ५० टक्के सूट, पालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करणार या सारख्या अनेक घोषणा महायुतीकडून करण्यात आल्या.
महायुती सरकारचा काय आहे जाहीरनामा?

1. लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी आण लघु उद्योग स्थापन करण्यासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
2. मुंबईला पाणीपुरवठा वाढवण्यासाठी पुढील ५ वर्षात गारगाई, पिंजाळ, दमणगंगा प्रकल्प पूर्ण करणार
3.बीएमसी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज उभारणार
4. पर्यावरण संवर्धन योजनेमार्फत १७ हजार कोटी रुपये
5.सर्व भाजी मंडईचे नुतनीकरण आणि पुर्नविकास करणार
6. फिश इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट सेंटर स्थापन करण्यात येणार
7.लघु उद्योग धोरण राबवले जाणार
8.पुर्नविकासाला जलदगती देणार, पागडीमुक्त मुंबई आणि फनेल झोनप्रश्नी जाहीर केलेली योजना जलदगतीने राबविणार
9. स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरची उभारणी करणार
10. बेस्टमध्ये २०२९ पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसेस,महिलांना ५० टक्के सवलत
11. बेस्ट बसेसची संख्या ५ हजारवरुन १० हजारांवर जाणार
12.रोहिंग्या व बांगलादेशी मुक्त मुंबई करणार
13. पालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करणार
14. मराठी कला केंद्र आणि अभ्यासिकेची उभारणी करणार
15.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्ताने मराठी तरुणांसाठी विशेष कार्यक्रम आणि आर्थिक तरतूद राबवली जाणार
16.रविंद्र नाट्य मंदिराच्या धर्तीवर अन्य नाट्यगृहांचा पुर्नविकास करणार आणि गरज पडल्यास ३ नवीन नाट्यगृहे उभारणार
17.पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाची स्थापना करणार
18.हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचं संग्रहालय उभारणार
19. विकसित मुंबईसाठी २०३४ चा आराखडा तयार होणार
राज्यातील 29 महानगरपालिकेसाठी येथे 15 जानेवारीला मतदान होणार आहे. मुंबई महानगरपालिकेत महायुती सरकार सत्ता आणण्यासाठी जोमाने मैदानात उतरली आहे. आता मुंबईत जनता किती कौल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.