ब्रेकिंग! पार्थ पवारांवर सरकार किती दिवस मेहरबान? कारवाई केव्हा होणार ; ठाकरेंच्या नेत्यांच्या सवालाने सरकार अडचणीत


पुणे : मुंढवा जमीन घोटाळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी चांगलीच अडचणीत सापडली आहे. याप्रकरणात पार्थ पवार यांच्यावर अद्यापही कारवाई न झाल्याने विरोधकांकडून टिकेची झोड उठवली जात आहे. आतापर्यंत शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीचे एक टक्का भागीदार असलेले द्विगविजय पाटील यांच्यावर कारवाई झाली आहे. तर इतरही सहआरोपींवर कारवाई झाली आहे. पण 99 टक्क्यांचे मालक असलेले पार्थ पवार यांच्यावर कारवाई नाही. यावरून उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी जमीन व्यवहार प्रकरणात चार मोठे सवाल केले आहेत.

उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी या जमीन व्यवहार प्रकरणात सोशल मीडिया X हँडलवरून हे सवाल विचारले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे असे ट्विट त्यांनी केले आहे.

१. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही?

       

२. पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस ‘मुदतवाढ-मुदतवाढ’ खेळणार आहात?

३. अमेडिया कंपनीत केवळ १ टक्का भागधारक दिग्विजय हा ९९ टक्के भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी झाला का?

४. मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सरकार कधी जाहीर करणार?

दरम्यान या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला अखेर अटक झाली आहे. मात्र पार्थ पवारांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.यांच्याबाबत यंत्रणा मात्र मूग गिळून आहेत. हा व्यवहार रद्द झाला असला तरी मुद्रांक शुल्कापोटी 42 कोटी भरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे ही मोठी रक्कम जो व्यवहार रद्द केला त्यापोटी भरण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ही रक्कम भरण्यासाठी सारखी मुदतवाढ देण्यात येत असल्याने विरोधक संतप्त झाले आहेत.

दरम्यान ही शुल्क माफी राजकीय दबावाशिवाय होणे शक्य नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची कल्पना नाही असे सांगणे, हे जनतेला शुद्ध वेडे बनवणे आहे. ते ही बहुमताच्या जोरावर, असा सणसणीत टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!