ब्रेकिंग! पुण्यात युवासेना प्रमुख निलेश घारेंच्या गाडीवर गोळीबार, बुलेट काच फुटली अन् गोळी…

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी शिंदे गटाच्या शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या गाडीवरती मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

शिंदे गटाच्या शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या वाहनावर वारजे माळवाडीत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी थेट गोळीबार केला. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी घारे यांच्या काळ्या रंगाच्या कारवर गोळी झाडली. घारे यांचे गणपती माथा परिसरामध्ये जनसंपर्क कार्यालय आहे. घारे हे आपल्या कार्यालयात सहकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळबार केला.
यावेळी घारे त्यांच्या गाडीमध्ये नसल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. पोलीस तपास करत आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून कोयता गॅंगची दहशत पसरवणाऱ्या घटना सातत्याने समोर येत आहेत, अशा घटनांमुळे पुण्यात भीतीचं वातावरणं निर्माण झालं आहे. पुणे शहर परिसरात सातत्याने होत असलेल्या गुन्हेगारीच्या घटना यामुळे पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या कामावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.