ब्रेकिंग! जिल्हा परिषद -पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मुदतवाढ,’ या’ तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे न्यायालयाचे आदेश


पुणे : गेल्या चार वर्षापासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याच्या निवडणुकाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात निवडणूकीसाठी मुदत वाढीस संदर्भात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी झाल्यानंतर या निवडणुका घेण्यास 15 फेब्रुवारीपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला न्यायालयाकडून वेळ देण्यात आला आहे.

नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर केला या निवडणुका 15 जानेवारी रोजी होणार असून तिसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी घ्यायच्या हा गंभीर प्रश्न निवडणूक आयोगासमोर उभा होता.यावर निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका दाखल करून यात मुदत वाढ द्यावी अशी मागणी केली.

त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने केवळ पंधरा दिवसाची मुदतवाढ देऊन 15 फेब्रुवारी 2026या तारखेपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका पूर्ण कराव्यात असे निर्देश दिले आहेत.राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी लागणार याची उत्सुकता उमेदवारासह सर्वसामान्य नागरिकांना लागून राहिली होती. अखेर पंधरा दिवसाच्या मुदतीत या निवडणुका होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!