ब्रेकिंग! पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या; थेट अजामीन पत्र वॉरंट..

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात सत्र न्यायालयाने अजामीन पत्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे

समोर आलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील जमीन खरेदी व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर आहे. या प्रकरणाची चौकशी आणि सुनावणी दीर्घ काळापासून सुरू असून विशेष पीएमएलए कोर्टाने खडसे यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला होता. आज या प्रकरणात सुनावणीसाठी हजर न राहिल्याने एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात सत्र न्यायालयाने थेट अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
आता या प्रकरणात पुढील सुनावणी १३ फेब्रुवारीला होणार आहे. या प्रकरणात शुक्रवारी आरोपनिश्चिती होणार होती. मात्र, एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

दरम्यान या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी ही बाब चितेंची मानली जात आहे. आता 13 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे. आता न्यायालयाच्या या निर्णयावर खडसे दांपत्य काय भूमिका घेते हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.