ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची राज्यसभा खासदारकीबाबत ‘वेट अँड वॉच’ भूमिका ; आता एप्रिल महिन्यापर्यंत…


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर त्या पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आहेत.एकीकडे हा दौरा असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या खासदारकी बाबत मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार नाहीत अशी माहिती मिळाली आहे. कारण सुनेत्रा पवार सध्या तांत्रिकदृष्ट्या राज्यातील विधिमंडळ सदस्य झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे सहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. एप्रिलमध्ये रिक्त होणाऱ्या राज्यसभेतील जागांचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो.

दरम्यान एनडीएमधील वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार सुनेत्रा पवार राज्यसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्याबाबत ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच पुढील दोन महिने तरी त्या राज्यसभेच्या सदस्य राहणार आहेत. आता एप्रिलनंतर यासंदर्भात पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

एकाच वेळी कोणत्याही नेत्याला केंद्र आणि राज्यात दोन पदांवर राहता येत नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ठराविक कालावधीमध्ये सुनेत्रा पवारांना आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावाच लागणार आहे. फक्त योग्य वेळ कोणती हे निश्चित होणं आणि त्यांना विधीमंडळाचे सदस्यत्व मिळणं या गोष्टीची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!