ब्रेकिंग!महापालिका निवडणुकांचे काउंटडाऊन सुरू,मतदानाच्या तारखेबाबत समोर आली अपडेट


मुंबई:नगरपरिषद निवडणुका पार पाडल्यानंतर आता राज्याचे लक्ष महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीकडे लागले आहे.या,महापालिका निवडणुका दोन टप्प्यात पार पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून आता महापालिका निवडणुकांच्या तारखांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.निवडणूक आयोग १४ किंवा १५ जानेवारी रोजी मतदान घेण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे सोमवारी किंवा शुक्रवारी मतदान झाल्यास नागरिक सुट्ट्या जोडून बाहेर पडतात आणि मतदानाची टक्केवारी घसरते, हा अनुभव लक्षात घेऊन १४ जानेवारी किंवा १५ जानेवारी अशा दिवशी मतदान होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. महापालिका निवडणुकांची प्रतिक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचे १४ डिसेंबर रोजी सूप वाजणार आहे. त्यानंतर तब्बल सात-आठ वर्षे रखडलेल्या या निवडणुकांची घोषणा १५ डिसेंबरनंतर केव्हाही होऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या घोषणेसोबच आचारसंहिता लागू होईल आणि निवडणूक प्रक्रियेला वेग येईल, अशी माहिती समोर आली आहे. आगामी १५ डिसेंबर रोजी राज्यातील १०० हून अधिक मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक प्रक्रिया फक्त ३० दिवसांत पूर्ण केली जाणार आहे. २०१७ मध्ये घोषणा आणि मतदान यात दोन महिन्यांहून अधिक अंतर होतं. मात्र यावेळी एका महिन्यात निवडणुका पार पडणार आहेत.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!