ब्रेकिंग!राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची अट ; काय घडणार?

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे येत या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठं वक्तव्य केलं आहे. सोबतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर त्यासाठी एक अटही समोर ठेवली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून केल्या जाणाऱ्या विलीनीकरणाच्या दाव्याला एका प्रकारे फेटाळले आहे.अजित पवार आणि आम्ही खूप चर्चा करायचो. दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाची चर्चा होत असती तर अजितदादांनी आम्हाला त्याची कल्पना दिली असती. एकत्रीकरणाबाबत आम्हाला सांगितलं असतं, असं फडणवीस म्हणाले.


राष्ट्रवादीच्या दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण होणार तर त्यावर भाजपाची भूमिका काय असेल? याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले,राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार असते तर आम्हाला त्यांबाबत सांगितले गेले असते. आता यापुढेही दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा होत असेल तर त्याआधी आमच्याशी चर्चा करावी, अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे.
दरम्यान, अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सध्या भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्तेत आहे. तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकावर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे विलीनीकरण करायचे असेल तर शरद पवार यांच्या पक्षाला सत्तेत सहभागी व्हावे लागेल किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सत्तेतून बाहेर पडावे लागेल.
दरम्यान असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका सांगितल्यानंतर आता पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
