ब्रेकिंग! अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या’ त्या ‘उमेदवारावर गुन्हा दाखल; खंडणी अन मृत्यूस कारणीभूत


पुणे:राज्यातील 29 महानगरपालिकाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना,पुणे महानगरपालिका निवडणुकीआधीच उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.राष्ट्रवादीचे प्रभाग 35 मधील उमेदवार फारुख शेख यांच्या त्रासाला कंटाळून एका 56 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या घटनेनंतर आता त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सादिक उर्फ बाबू बाबर असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पुण्यातील लष्कर भागात असलेल्या ऑफिसमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र आत्महत्या करण्याआधी सादिक कपूर यांनी त्यांच्या हातावर आणि कागदावर सुसाईड नोट लिहलेली होती.यामध्ये अनेकांची नावे होती. त्यातील एक नाव अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हडपसर भागातील उमेदवार फारुख शेख असे होते. आता त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फारुख यांनी प्रभाग 41 मधील रहिवाशी सादिक कपूर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पुणे पोलिसांनी मृत व्यक्तीच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार, फारुक इनामदारसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, खंडणी आणि जागेच्या व्यवहारातून सादिक यांनी जीवन संपवलं.

फारूख यांनी सादिक कपूर यांना खंडणी मागितली आणि धमकवण्याचा प्रयत्न देखील केला होता. त्यानंतर सादिक यांनी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि खंडणी मागितल्याप्रकराणी अजित पवार यांच्या उमेदवारावर गुन्हा दाखल झाला आहे. महापालिका निवडणुकीआधी उमेदवाराच्या या प्रतापाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!