ब्रेकिंग! भाजपला मोठा धक्का, नितीशकुमार यांनी भाजपा सरकारला दिलेला पाठिंबा काढला, सरकार पडणार?

नवी दिल्ली : राजकारणामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मणिपूरमध्ये जनता दल (युनायटेड) ने भाजपचा पाठिंबा काढून घेतला आहे. जेडीयूचे एकमेव आमदार मोहम्मद अब्दुल नसीर आता विरोधी पक्षात सहभागी होणार आहेत. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

JDU हा NDA घटक पक्षाचा एक महत्त्वाचा भाग आहे. जेडीयूच्या या निर्णयापासून बीरेन सिंह यांच्या सरकारला कोणताही धोका नाही. काही दिवसांपूर्वी कॉनरॅड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीनेही बिरेस सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. मात्र सरकार स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र यामुळे संबंध बिघणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केंद्रात त्यांचा मोदी सरकारला पाठिंबा आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूने राज्यातील सहा जागा जिंकल्या होत्या. मात्र, पाच महिन्यांनंतर सहापैकी पाच आमदार भाजपमध्ये दाखल झाले. यामुळे याची बरीच चर्चा रंगली होती. 60 सदस्यीय विधानसभेत सध्या भाजपचे 37 आमदार आहेत.

त्याला नागा पीपल्स फ्रंटचे पाच आमदार आणि तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे त्याला आरामदायी बहुमत मिळाले आहे. यामुळे सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. मात्र केंद्र सरकारमध्ये पाठिंबा काढला जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, जदयूने मणिपूरमध्ये एनडीएचा पाठिंबा काढून घेण्याचे राज्यपालांना पत्र देणाऱ्या प्रदेशाध्यक्षांनाच नारळ दिला आहे. मणिपूरचे जदयू प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सिंह यांना अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.