ब्रेकिंग! अजित पवारांचा बालेकिल्ला भाजपने हिसकावला, पिंपरीत आता भाजपचा महापौर,आरक्षण सोडत जाहीर


पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक सगळ्यात हायहोल्टेज ठरली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कधी काळी बालेकिल्ला असलेला पिंपरी चिंचवड आता भाजपने हिसकावला आहे. आता पिंपरी चिंचवड मध्ये भाजपचा महापौर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये 128 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत भाजपनं 86 जागा जिंकत अजित पवार गटाला मोठा धक्का दिला.आता येथील आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. पिंपरी चिंचवडची जागा महिला ओपनसाठी राखील सोडण्यात आली आहे.पिंपरी चिंचवड महापालिकेत सर्वसाधारण गटातील महिला उमेदवारास महापौर पदाचा मान मिळणार आहे. पिंपरी-चिंचवडच्या,128 सदस्यांच्या सभागृहात एकूण 64 महिला निवडून आल्या आहेत.

भाजपने ८६ जागा जिंकून ‘पिंपरीत दादांऐवजी कमळ’ हेच मतदारांच्या मनात असल्याचे दाखवून दिले. येथे राष्ट्रवादी काँग्रेसला ३६ जागा मिळाल्या, परंतु सत्ता स्थापनेसाठी हा आकडा अपुरा ठरला. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भाजपचा महापौर राहणार आहे

​पक्षनिहाय महिलांची संख्या

​भाजप: ४२ महिला उमेदवार
​राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): १८ महिला उमेदवार

अजित पवारांचा बालेकिल्ला असलेली पिंपरी चिंचवड ही महानगर पालिका भाजपनं सलग दुसऱ्यांदा हिसकावून घेतली आहे. महापालिका निवडणूक महायुती स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर होताच अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार ताकद लावली होती मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!