ब्रेकिंग! गौरी गर्जे प्रकरणात मोठी अपडेट ; ‘गौरीला तिघांनी गळा दाबून मारलं’, वडिलांचा धक्कादायक दावा


पुणे : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी गर्जे पालवे यांनी मुंबईतील वरळी येथे आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला.या प्रकरणी पोलिसांनी पती अनंत गर्जेला अटक केली होती. त्याची पोलीस कसून चौकशी करत होता. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.गौरी गर्जेनं आत्महत्या केली नाही, तर तिला तिघांनी गळा दाबून मारलंय, असा दावा गौरीचे वडील अशोक पालवे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आणखीन कोणा कोणाचा समावेश असणार याचा पोलीस तपास करत आहे.

गौरीचे वडील अशोक पालवे याबाबत म्हणाले की, गौरीच्या मृत्यू प्रकरणात फक्त एकटा अनंतच आरोपी नाही. त्याचे बहीण-भाऊ देखील यात आरोपी आहेत. त्या दोघांना अद्याप अटक केली नाही. लग्न होण्याआधीपासून अनंत वरळीत राहत होता. माझ्या मुलीला दोघा तिघांनी गळा दाबून मारलं आहे. आम्ही खरं बोलत आहोत. एकतर आम्हाला न्याय द्या, नाहीतर आम्हाला मारण्याची परवानगी द्या. फॉरेन्सिक टीम घरामध्ये गेल्यानंतर त्यांचे नातेवाईक त्या घरांमध्ये उपस्थित होते. त्यामुळे गौरीच्या मृत्यूला आत्महत्येचं लेबल लावू नका असं त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे. यावर पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

दरम्यान अनंत गर्जे याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर गौरीच्या आई वडिलांनी खळबळजनक दावे केले आहेत.आरोपीला इतक्या लवकर त्याला न्यायालयीन कोठडी का देण्यात आली? यातील दोन आरोपी अजून पकडले गेले नाहीत. ते दोघे फरार आहेत. पोलिसांकडून सतत सांगितले जात आहे चौकशी होत आहे तपास करत आहोत. पण आज १२ दिवस झाले आहेत. तपासात काहीच निष्पन्न झालं नाही. ते सर्व खोटं बोलत आहेत. तो गौरीला रोज मारत होता. अनंत गर्जेचे भाऊ आणि बहीण देखील एकत्र राहून तिला मारत होते. त्यामुळे त्या दोन आरोपींची देखील चौकशी व्हायला पाहिजे. अशी मागणी गौरीच्या आई वडिलांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!