ब्रेकिंग! भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून महत्त्वाची अपडेट


पुणे:राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले अडचणीत आले आहेत. महाड मधील निवडणुकीच्या वेळी केलेल्या मारहाणप्रकरणी त्यांना अटक होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मंत्री भरत गोगावलेंना मोठा धक्का बसणार आहे.

महाड नगरपालिका निवडणूक काळात मतदानाच्या दिवशी भरत गोगवले यांचा पुत्र विकास गोगावले आणि त्यांच्या साथीदारांनी कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. तसेच गाड्यांची तोडफोड देखील केली होती. या घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणात विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने तब्बल तीन वेळा फेटाळला आहे. आता महाड पोलीस कोणती कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विकास गोगावले यांना अटक झाल्यास भरत गोगावलेंसाठी मोठा धक्का असणार आहे.

नगरपरिषद निवडणुकीच्या दरम्यान, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. या आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्यांमुळे राजकारण चांगलंच तापलं होतं. महाड नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक २ मध्ये मतदानाच्या दिवशी झालेल्या राडा प्रकरणी माणगाव न्यायालयाने दोन वेळा, तर मुंबई उच्च न्यायालयाने एक वेळा विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे. त्यामुळे या प्रकरणात कायदेशीर अडचणी अधिकच वाढल्या आहेत.

       

दरम्यान शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद होऊन मारहाण, वाहनांची तोडफोड आणि शस्त्र बाळगल्याचे प्रकार घडले होते. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, विकास गोगावले यांच्यासह शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधात महाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचेही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे बंधू हणमंत जगताप आणि सुशांत जाबरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या प्रकरणामुळे महाडमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!