ब्रेकिंग! खोक्या भोसलेविरोधात बीड पोलिसांची मोठी कारवाई, तस्करीचे पुरावे जप्त, आमदार सुरेश धस अडकणार?


बीड : जिल्ह्यातील शिरूरमधील सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’ याच्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामुळे यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तो आमदार सुरेश धस यांच्या जवळचा मानला जात आहे. वनविभागाने काही दिवसांपूर्वी त्याच्या घरावर धाड टाकून वन्यजीवांच्या शिकारीचे पुरावे जप्त केले होते.

सतीश भोसले अद्याप फरार आहे, त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक सक्रिय आहे. त्याच्या फरारी अवस्थेत असतानाही त्याच्याकडून लवकरच सरेंडर होण्याची माहिती मिळाली आहे. बीड पोलिसांनी सोमवारी रात्री त्याची गाडी जप्त केली आहे. ही कारवाई त्याच्या अपराधाच्या प्रकरणांमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

यामुळे सुरेश धस देखील अडचणीत आले आहेत. आता बीड पोलिसांनी त्याच्या संपत्तीवर कारवाई सुरू केली आहे आणि लवकरच त्याला अटक केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची अधिक तपासणी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला आणणारी ठरली आहे. त्याचे अनेक कारनामे पुढे येत आहेत.

व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घेत आणि गाडीच्या डॅशबोर्डवर नोटांचे बंडल फेकताना दिसला आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याच्या श्रीमंतीचा स्रोत विचारला आहे. त्याच्यावर एक गरीब व्यक्तीला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. यामुळे तो अडचणीत आला आहे.

त्याचा फाइव स्टार हॉटेलमधील थाट आणि हेलिकॉप्टर प्रवास किती पैसे खर्च झाले? हे पैसे कुठून आले?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय माहिती पुढे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून याबाबत रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!