ब्रेकिंग! रेशन दुकानदारांच्या मनमानीला लागणार लगाम ; पुरवठा विभागाने घेतला लाभार्थ्यांसाठी मोठा निर्णय


पुणे : राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल झाल्याने रेशन दुकानदारांच्या मनमानी कारभाराला आता चांगलाच लगाम बसणार आहे.या व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठा विभागाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.रेशन दुकानात भेट दिल्यानंतरच नागरिकांना पुढील महिन्याचे धान्य मिळणार की नाही आणि मिळणार असेल तर ते किती प्रमाणात मिळणार याची माहिती मिळत होती. मात्र आता ही व्यवस्था आणखी फायदेशीर बनवण्यात आली आहे.आता ही सगळी माहिती नागरिकांना रेशन दुकानात जाण्यापूर्वीच मिळणार आहे. ही माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळणार आहे. रेशन धारकांसाठी नवीन सुविधा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबरपासून या प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

पुरवठा विभागाने रेशन धारकांसाठी मोठा निर्णय घेतल्याने त्यांना मोठा फायदा होणार आहे. एसएमएसद्वारे प्रत्येक लाभार्थ्याला धान्य वितरणापूर्वी एक मॅसेज पाठवला जाणार आहे. या मॅसेजमध्ये नागरिकांना मिळणाऱ्या धान्याचा प्रकार जसे की बाजरी, तांदूळ, गहू आणि त्याचे प्रमाण आणि वितरणाचा संबंधित महिना याची माहिती दिली जाणार आहे.याशिवाय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत दिल्या जाणाऱ्या धान्याचे संपूर्ण पालन होत असल्याची माहिती देखील संदेशात उपलब्ध राहणार आहे. नागरिकांना धान्य मिळाले आहे की नाही याची अपडेटेड माहिती सुद्धा एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. या सुविधेचा रेशन कार्डधारकांना मोठा फायदा होणार आहे.

पुरवठा विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे धान्य वितरणातील अनियमितता कमी होण्याची शक्यता वाढली आहे. विशेष बाब म्हणजे पुरवठा विभागाने तक्रारी नोंदवण्यासाठी देखील काही टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. १८००-२२२-४९५० आणि १९६७ या टोल फ्री क्रमांक वर नागरिकांना धान्य वितरण संदर्भातील तक्रारी नोंदवता येतील अशी माहिती दिली जात आहे.नागरिक धान्य वितरणाबाबत कोणतीही अडचण, संशयास्पद व्यवहार किंवा संदेश न मिळाल्यास या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. एसएमएस सेवा फक्त त्या लाभार्थ्यांना मिळेल ज्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक त्यांच्या रेशनकार्डशी लिंक केला आहेदरम्यान ज्यांचा क्रमांक अद्याप नोंदलेला नाही त्यांनी जवळच्या रेशन दुकानात जाऊन ताबडतोब अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्येक लाभार्थ्याला या सुविधेचा संदेश न मिळाल्यास किंवा माहिती पडताळून पाहण्याची आवश्यकता असल्यास लाभार्थी “मेरा रेशन” अॅपवर आधार क्रमांक टाकून मंजूर धान्य कोटा आणि प्रत्यक्ष मिळालेल्या धान्यातील फरक सहज तपासू शकतात.त्यामुळे अनियमित वितरण, जादा कपात किंवा बनावट नोंदी त्वरित उघड होऊ शकतात. पुरवठा विभागाने काही तांत्रिक अडचणी मान्य केल्या आहेत. काही लाभार्थ्यांना चुकीचे संदेश मिळाल्याच्या तक्रारी नोंदल्या गेल्या असून त्यावर प्रणालीमध्ये सुधारणा सुरू आहे.

आगामी काही दिवसांत एसएमएस सेवा अधिक सक्षम आणि अचूक होणार आहे. या नवीन प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ, श्रम वाचणार असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!