ब्रेकिंग! अजित पवारांच्या शिलेदाराने मारली बाजी; वडगाव मावळमध्ये सुनिता ढोरे एकामताने विजयी


पुणे :राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात झाली आहे .मतमोजणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच सुरुवातीचे कल हाती लागले आहे .यामध्ये वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीतील पहिला निकाल हाती आला आहे. अजित पवारांच्या शिलेदाराने यामध्ये बाजी मारली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनीता राहुल ढोरे या निवडून आल्या आहेत. त्या नगरसेवक पदाच्या उमेदवार होत्या अवघ्या एका मताने त्यांनी निवडणूक जिंकली आहे. सुनिता ढोरे या प्रभाग क्रमांक चार मधून निवडणूक लढवत होत्या.त्यांना एकूण 323 मत मिळाली त्यांनी भाजपच्या पूजा अतीश ढोरे यांना एका मताने पराभूत केल आहे.

वडगाव मावळमध्ये नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व 17 जागांसाठी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी थेट लढत झाली. काही प्रभागांमध्ये अपक्षांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत झाली. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारल्याचं दिसून येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!