ब्रेकिंग! झेडपी निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार, यापुढे आता….

पुणे: नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. या निकालात मिळालेले अपयश यश लक्षात घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोकण पश्चिम महाराष्ट्र सोडला तर इतर जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये फारसे यश मिळवता आला नाही. यावरून आता एकनाथ शिंदेंनी 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचले असून लवकरच मंत्रिमंडळात त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत शिंदे असल्याचं समजत आहे.
दरम्यान एकनाथ शिंदेंनी निवडणूक निकालानंतर यश अपयश लक्षात घेऊन शिवसेनेच्या सर्व जिल्हासंपर्क प्रमुख, नेते आणि सचिवांना संघटना बांधणीसाठी दौरे करण्याच्या सूचना दिल्या आहे. निवडणुकांमध्ये आपण कुठे कमी पडलो, का पडलो याची करणे लक्षात घेऊन त्यांना सूचनाही दिल्याची माहिती आहे

.दरम्यान जिल्हा परिषद, नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडणुकीत शिवसेना पक्ष जरी दुसऱ्या क्रमांकावर असला तरी अपेक्षित कामगिरीही नेत्यांकडून झाली नसल्याने मंत्रिमंडळातून कोणाला डच्चू मिळतो आणि कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे पाहणं महत्वाचं आहे