ब्रेकिंग! अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री? राष्ट्रवादीची कमान हाती घेणार,हालचालींना वेग

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपद रिक्त झाले आहे. त्यामुळे त्यांची जागा कोण घेणार? याबाबतची चर्चा चालू झाली आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीची कमान त्यांनी हाती घ्यावी आणि उपमुख्यमंत्रीपदही त्यांनी सांभाळावं यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या घडामोडींकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचे बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले.आज विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक प्रमुख नेते त्यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, अजित पवार यांच्या नंतर सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावं, अशी मागणी अजितदादा समर्थकांनी केली आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर बारामतीतील अजितदादा प्रेमींनी ही भावना व्यक्त केली आहे. सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री केले तर अजित पवार हे नाव कायम राहिल, अशी भावनाही कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
