ब्रेकिंग!अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत उलथापालथ! सुनेत्रा पवार राज्यात तर पार्थ पवार…?

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय समीकरणात मोठा बदल होणार होणार आहे. रिक्त झालेल्या त्यांच्या राजकीय जागांवर आता पवार कुटुंबातील वारसांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून खासदार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे नवी जबाबदारी देण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे

समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उतरवण्याचा विचार पक्षात सुरू आहे. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या खासदार असल्या तरी, बारामतीचा बालेकिल्ला राखण्यासाठी त्यांना विधानसभेच्या मैदानात उतरवले जाणार आहे.तर दुसरीकडे, पार्थ पवार यांना सक्रिय राजकारणात पुन्हा मोठी संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
दरम्यान अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादीत मोठा फेरबदल होणार आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विधानसभा लढवल्यास, त्यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना पाठवण्याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. पार्थ पवार यांना दिल्लीच्या राजकारणात सक्रिय करण्याचा पक्षाचा मानस आहे. त्यामुळे आता लवकरच याबाबतची अधिकृत माहिती समोर येईल.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने पवार कुटुंबियावरच नव्हे तर अख्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली.अजितदादांच्या पश्चात पक्ष सावरण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनाच पुढे करणे, हाच एकमेव पर्याय सध्या पक्षासमोर आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
