ब्रेकिंग! अजित पवारांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ; झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर…

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निर्णयामुळे राज्यात तीन दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवरच आता राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुका दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या चालू निवडणुकाच्या मतदानाचे वेळापत्रक तातडीने बदलण्यात आले आहे. आता नियोजित 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारी 2020 रोजी मतदान पार पडणार आहे. तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणुकांचे नवीन वेळापत्रक?

प्रचारसमाप्ती- 5 फेब्रुवारी 2026 (रात्री 10 वाजता)
मतदान- 7 फेब्रुवारी 2026 (सकाळी. 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत)
मतमोजणी 9 फेब्रुवारी 2026 (सकाळी 10 वाजल्यापासून)
निकाल प्रसिद्धी – निवडून आलेल्या सदस्यांची नावे 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत राजप्रकारात प्रसिद्ध केली जातील.
सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्हा परिषदेला आणि पुणे जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांना तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर अनुक्रमे जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती मिळणार आहेत. जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांचा कार्यकाळ 13 मार्च 2022 तर, जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 20 मार्च 2022 रोजी संपुष्टात आलेला आहे.
निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या जिल्हा परिषदा
पुणे, कोल्हापूर, सांगली,सातारा, सोलापूर, रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,छत्रपती संभाजीनगर,परभणी,धाराशिव लातूर.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यामुळे राज्य सरकारने 28 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत राज्यात शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आधीच या निवडणुका वेळेत घेण्यासाठी उमेदवारांना प्रचारासाठी कमी वेळ देण्यात आला होता.
त्यातच आता शासकीय दुखवट्यामध्ये तीन दिवस प्रचार करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळत नसल्याचे निदर्शनास आल्याने दोन दिवसांची ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
