ब्रेकिंग! अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने आणखीन एक शिलेदार गमावला,पुण्याच्या माजी महापौरांचे निधन

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी दुसरा मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विश्वासू सहकारी म्हणून शांतीलाल सुरतवाला यांची ओळख होती. मान कापली तरी पवार साहेबांना सोडणार नाही असं म्हणणारे या राष्ट्रवादीच्या नेत्याचं निधन झाल आहे. गेल्या काही महिन्यापासून ते कँन्सरशी झुंज देत होते. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचे निकटवर्तीय, गणेश मंडळातील सक्रिय कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या शांतीलाल सुरतवाला यांच्या निधनाने पुण्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. आनंद ऋषीजी ब्लड बँकचे ते संस्थापक होते.

1992 ते 1993 या कालावधीत पुण्याचे महापौर पद शांतीलाल सुरतवाला यांनी भूषवले होते. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही
1979च्या पुण्यातील सिटी पोस्ट वॉर्डातून निवडणूकितुन झाली.1979 ते 2007 या प्रदीर्घ काळात नगरसेवक आणि महापौर अशी जबाबदारी त्यांनी सांभाळली.
गणेश मंडळाचे कार्यकर्ते म्हणूनही त्यांचा शहरात मोठे सामाजिक वजन होते. शरद पवारांनी स्वतःहून महापौरपदाची जबाबदारी त्यांना दिली होती. महापौर असताना त्यांनी पुण्यात विविध कल्पना राबवल्या, त्या यशस्वी केल्या.एक संयमी, अभ्यासू आणि विकासकामे करणारा नेता हरपल्याची भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
