ब्रेकिंग! अजित पवारांच्या निधनानंतर पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच’ किंगमेकर ‘ ; PRAB एक्झिट पोलचा अंदाज

.पुणे: राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीसाठी काल (7 फेब्रुवारी) मतदान पार पडल्यानंतर निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे. बहुचर्चित अशा पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना पॉलिटिकल रिसर्च अँड ॲनोलिसिस ब्युरो या संस्थेच्या एक्झिट पोलने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच पक्ष’ किंगमेकर’ ठरण्याचा अंदाज त्यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, पुणे जिल्हा परिषदेच्या 73 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस 47 सर्वाधिक जागा मिळवून पहिल्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.सत्ताधारी असलेला भाजप 18 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता असून, शिंदे गटाच्या शिवसेनेला 6 तर ठाकरे गटाच्या शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागू शकते.यामध्ये काँग्रेसला या निवडणुकीत एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बारामतीला येत असलेल्या अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झाले. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या निधनानंतर पहिल्याच मोठ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांची मोठी साथ मिळाली असल्याच दिसून येत आहे.

सोमवारी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.या निवडणुकीचे निकाल महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणावर आणि पुढील राजकीय समीकरणावर मोठा परिणाम करू शकतात.