ब्रेकिंग! अजित पवारांना मोठा धक्का ; रुपाली ठोंबरे -पाटील शिंदेच्या शिवसेनेत दाखल होणार?


पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना अनेक ठिकाणी बड्या नेत्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी आपल्यास सोईच्या पक्षात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसणार आहे. अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्या लवकरच अजित पवारांची साथ सोडून शिंदेच्या शिवसेनेत दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील नाराज आहेत. त्यामुळेच त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. या दाव्याला बळ देणारी महत्वाची माहिती समोर आली आहे. रुपाली पाटील यांनी नुकेतच शिंदे यांच्या पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे मुंबईत भेट घेतली आहे. विशेष म्हणजे रूपाली पाटील यांच्यासोबत काँग्रेसच्या संगीता तिवारी आणि शिंदे गटाच्या शर्मिष्ठा येवले यादेखील उपस्थित होत्या. त्यामुळे रुपाली ठोंबरे लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका डॉक्टर महिलेने आत्महत्या करून जीवन संपवले होते. या प्रकरणी एक पोलीस अधिकारी आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले होते.. याच प्रकरणावर महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी पोलिसांची बाजू घेतली होती. त्यानंतर चाकणकर यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. रुपाली ठोंबरे पाटील यांनीदेखील चाकणकर यांना लक्ष्य केले होते. हे प्रकरण काहीसे मागे पडल्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाने रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी केली. या सर्व घडामोडीनंतर रुपाली ठोंबरे पाटील नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!