ब्रेकिंग! अजित पवारांच्या ओळखीबाबत तपासात मोठा खुलासा, घड्याळामुळे नव्हे तर ‘या’ गोष्टीमुळे ओळख पटली…


पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर त्यांची ओळख घड्याळामुळे पटली असल्याची माहिती समोर आली होती. मात्र या अपघाताच्या तपासात आता महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे.अजित पवारांची ओळख घड्याळामुळे नाही तर त्यांच्या कुर्त्याच्या कापडामुळे पटल्याच समोर आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, विमान अपघातानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची ओळख त्यांच्या हातावरील कुर्त्याच्या कापड्यामुळे पटल्याचं समोर आलं आहे. त्याच्या डाव्या हातावर घड्याळासारखा दिसणारा भाग कुर्त्याचा होता.याआधी अजित पवारांची ओळख हातातील घड्याळावरुन पटली होती. आता याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मृत्यूनंतर आतापर्यंत अजित पवारांचा घड्याळ देखील सापडलेल नाही.

बारामतीतील अजित पवारांच्या विमाना अपघातानंतर घटनास्थळावरून महत्त्वाचे फोटो देखील समोर आले होते. या फोटोमध्ये विमानाचे तुकडे,विमानाची सीट,काही अर्धवट जळालेली कागदपत्रे आणि डायरी सापडली आहे. या घटना स्थळावरून काही आणखी सापडत का याचा शोध देखील सुरू आहे.

दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि पूर्णपणे खात्री पटवण्यासाठी प्रशासनाकडून DNA चाचणी करण्यात आली. त्यानंतर अजित पवारांची ओळख ही कापडावरून पटली असल्याच समोर आलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!