ब्रेकिंग! २९ महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात,आयोगाकडून घोषणा कधी होणार? महत्त्वाची अपडेट

पुणे:महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेल्या या सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका आता एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. यासाठी राज्य निवडणूक आयोग 15 डिसेंबर नंतर कधीही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकतो.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेमुळे नागपूर अन् चंद्रपूरच्या निवडणुका नंतर होतील, असा अंदाज वर्तवला जात होता. पण राज्यातील सर्व महापालिकेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होतील. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसात आयोगाकडून याबाबतची घोषणा होईल. १५ तारखेनंतर राज्यात कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते. २९ महापालिकेसाठी १२ जानेवारीनंतर मतदान होईल अन् दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर होऊ शकतो.
निवडणूक आयोगाकडून राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांनी महापालिकांना निवडणूक अधिकारी आणि सहायक अधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. राज्यात १५ डिसेंबरनंतर कधीही महापालिका निवडणुकीची घोषणा होऊ शकते.

दरम्यान भाजप, काँग्रेस अन् ठाकरेंकडून महापालिकेतील इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात येत आहेत. भाजपने महत्त्वाच्या महापालिकेत सर्वेक्षणही केल आहे.राज्यात अखेरच्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, असे सांगण्यात येत आहे. राज्यातील २० जिल्हा परिषदेतील आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा आरक्षण सोडत होण्याची शक्यता आहे. २१ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात आरक्षणावर सुनावणी होणार आहे. त्यानंतरच निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे.

त्यामुळे जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
