ब्रेकिंग! अजित पवारांच्या मृत्यूच्या 24 तासानंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स समोर, अपघाताच गुड उलगडणार? तपास सुरू….

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी 28 जानेवारी हा दिवस काळा दिवस ठरला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. आता या विमान अपघाताबाबत,वेगवेगळी माहिती समोर येत आहेत. क्रश झालेल्या विमानाचा छोटासा भाग म्हणजेच विमानातील ब्लॅक बॉक्स समोर आला आहे. यामुळे अपघाताच्या कारणाचा उलगडा होणार आहे.

बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला.त्या घटनास्थळावरून फॉरेन्सिक लॅबच्या टीमने ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला असून त्याचा तपास सुरू आहे.ब्लॅक बॉक्स आता डिकोड करण्यात येणार आहे. फ्लाइट डेटा रेकॉर्डरमुळे विमानाचा वेग, उंची आणि इंधनाची माहिती मिळणार आहे. तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमुळे वैमानिकांमधील शेवटच्या क्षणांचे संभाषण समोर येणार आहे.
विमानाचा ब्लॅक बॉक्स एका अतिशय खास तंत्राचा वापर करून बनवलेला असतो. जेणेकरून तो अपघात, आग, पाणी आणि धक्क्यांना तोंड देऊ शकेल. मजबूत मटेरियलपासून बनवलेला ब्लॅक बॉक्सचा बाह्य भाग टायटॅनियम किंवा स्टेनलेस स्टीलचा बनलेला आहे, जो एक अतिशय शक्तिशाली धातू आहे.

1100°C पर्यंतच्या आगीत सुमारे 60 मिनिटे टिकून राहण्यासाठी हे डिझाइन केलेलंआहे. म्हणजे, विमान जळले तरी त्याचा डेटा सुरक्षित राहतो. जर विमान समुद्रात पडलं तर हा ब्लॅक बॉक्स 20,000 फूट खोलीपर्यंत पाणी आणि दाब सहन करू शकतो.
या क्रश झालेल्या विमानाच्या या ब्लॅक बॉक्समधील डेटा डिकोड करण्यासाठी किमान 3 ते 4 आठवड्यांचा कालावधी लागणार असून त्यानंतरच अपघाताचे नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.