ब्रेकिंग! दिल्ली स्फ़ोट प्रकरणातील दहशतवादी डॉक्टरांच्या मोबाईलमध्ये 200 व्हिडिओ, थेट ISIS शी कनेक्शन…

पुणे : राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटाप्रकरणी सुरू असलेल्या तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय असलेल्या डॉक्टर मुझम्मिल, डॉक्टर आदिल, डॉक्टर शाहीन आणि इरफान यांच्या मोबाईल फोनमधील डिलीट केलेला डेटा आता तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. यापैकी डॉक्टर मुझम्मिलच्या फोनमध्ये तब्बल 200 व्हिडिओ मिळाले आहेत. या व्हिडिओंपैकी सुमारे 80 व्हिडिओ ISIS शी संबंधित दहशतवाद्यांच्या भाषणांचे तसेच दहशतवादी प्रशिक्षण, बॉम्ब बनवण्याचे तंत्र आणि रासायनिक अभिक्रियांशी संबंधित संशोधनावर आधारित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे दिल्ली स्फोटामागील कटाची व्याप्ती आणि त्याचे आंतरराष्ट्रीय संबंध अधिक स्पष्ट होत आहेत. या प्रकरणातून आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेला हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असून, त्यात आय २० कारमध्ये स्फोटके लावून आत्मघाती हल्ल्याच्या पद्धतीने स्फोट करण्यात आला, असा गुप्तचर संस्थांना संशय आहे. लाल किल्ल्याजवळील नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावरील ट्रॅफिक सिग्नलजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर २० जण जखमी झाले होते. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या कार स्फोट प्रकरणी यूएपीएच्या कलम १६ आणि १८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय स्फोटक पदार्थ अधियम कलम ३ आणि ४ सुद्धा जोडण्यात आले आहे.दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हाती अनेक महत्त्वपूर्ण पुरावे लागले आहेत.
दरम्यान या हल्ल्याशी संबंधित असलेल्याडॉक्टर मुझम्मिलच्या फोनमध्ये तब्बल 200 व्हिडिओ मिळाले आहेत. या व्हिडिओंपैकी सुमारे 80 व्हिडिओ ISIS शी संबंधित असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
