ब्रेकिंग! मुंढव्यातील 1800 कोटींचा जमीन घोटाळा; दोन बड्या अधिकाऱ्यांचा बळी जाणार, पार्थ पवारांना ‘अभय’ मिळणार ?

पुणे: बहुचर्चित पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणाची महत्वाची माहिती समोर आली आहे. तब्बल 1800 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल समोर आला आहे.या अहवालामध्ये दोन बड्या अधिकाऱ्यांचा बळी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे तर पार्थ पवार यांचे काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सादर सादर करण्यात आली होती. समितीने आपला सविस्तर अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.या अहवालात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. तर, या व्यवहार प्रक्रियेत अनियमितता करणाऱ्या दोन वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहवाल समोर येणार आहे.
प्रकरण नेमकं काय आहे?

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे 1800 कोटी रुपये बाजारमूल्य असलेली ‘महार वतन’ जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला होता. या जमीन व्यवहारामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारीनंतर, राज्य सरकारने महसूल सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती.चौकशी समितीने पार्थ पवार यांना या प्रकरणात ‘अभय’ दिले आहे.
दरम्यान हा व्यवहार मार्गी लावण्यासाठी आणि आवश्यक परवानग्या देण्यासाठी मदत करणाऱ्या दोन शासकीय अधिकाऱ्यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.
मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना दिलासा मिळाला असला तरी सहसंचालक दिग्विजय पाटील आणि शितल तेजवानी अडचणीत आले आहेत तांत्रिक पुरावे मिळाल्याने त्यांना दोषी धरले असून या प्रकरणातील 21 कोटींच्या वसुलीमुळे कंपनीवर देखील मोठी टांगती तलवार आहे.