Brazil Plane Crash : मोठी बातमी! विमानाचा भीषण अपघात! ६२ प्रवाशांचा धक्कादायक अंत, घटनेने उडाली खळबळ…


Brazil Plane Crash : मागच्या काही दिवसांमध्ये विमान कोसळण्याचा दुर्घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नेपाळमध्ये विमान अपघाताची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा मोठा भीषण अपघात झाला आहे.

ब्राझीलमध्ये विमानाला भीषण अपघात झाला आहे. साओ पाऊलोच्या सीमावर्ती भागात विमान अपघातग्रस्त झालं आहे. या विमानात ६२ जण होते. सीएनएनच्या वृत्तानुसार ब्राझीलच्या नागरी सुरक्षा विभागाने अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

विमान कोसळल्यानं अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या अपघातात विमानातील सगळ्या प्रवाशांना मृत्यू झाल्याची माहिती ब्राझीलचे अध्यक्ष लूला डी सिल्वा यांना दिली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करत नागरिकांना एक मिनिटाचं मौन राखून मृतांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केलं आहे.

साओ पाऊलोच्या विन्हेडो शहरात एक विमान कोसळले. या विमानात ५८ प्रवासी आणि ४ कर्मचारी होते. अपघातात ते सगळे मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे प्रत्येकानं मिनिटभर उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पित करावी, असे आवाहन ब्राझीलचे अध्यक्ष लूला डी सिल्वा यांनी नागरिकांना केले. Brazil Plane Crash

विमान अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात विमान एखाद्या कागदाच्या पानासारखं हवेत फिरताना दिसत आहे. विमान जमिनीवर कोसळताच आसमतांत काळा धूर पसरताना दिसतो. विमान जमीनदोस्त होताच त्याला आग लागते.

विमान नागरी वस्तीत कोसळलं. एका झाडाजवळ विमान कोसळलं. विमान कोसळताच त्यानं पेट घेतला. द गार्डियनच्या वृत्तानुसार, हे विमान वोपास लिन्हास एरियासकडून चालवण्यात येत होते.

पराना राज्यातील कास्कावेलमधून ते साओ पाऊलोतील गुआरुल्होसला जात होतं. साओ पाऊलोच्या अग्निशमन दलानं अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विभागाची सात पथकं घटनास्थळी आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!