भाजपला दोन्ही ‘ राष्ट्रवादी’ एकत्र भिडणार ; पिंपरी चिंचवडमध्ये पवारांची फिल्डिंग,सुप्रिया सुळेंचा एक फोन अन्…


पुणे:आगामी होणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी मतविभाजनाचा फटका बसू नये यासाठी एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.

पिंपरी चिंचवडमधील अजितदादांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे या दोघांची नुकतीच बैठक झाली. नाना काटे यांना सुप्रिया सुळे यांचा फोन आला होता. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. दादांना देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढाव्यात असं सांगणारं असल्याच त्यांनी स्पष्ट केलं होते असा दावा नाना काटे यांनी केला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे. यापूर्वी दादांच्या राष्ट्रवादीसोबत न जाण्याचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. पण आता राजकीय गणितं आणि समीकरणं बदलली आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड नंतर पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीविरोधात भाजप असा सामना रंगणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत काँग्रेसचे एकहाती सत्ता होती. पण त्याचेच काही शिलेदार फोडून भारतीय जनता पक्षाने 2017 च्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला. ती सल आज ही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला लागली आहे. त्यामुळे आता भाजपला भिडण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!