पहलगाम हल्ला प्रकरणी एनआयएला मोठं यश! दोघांच्या मुसक्या आवळल्या, तपासातून धक्कादायक माहिती समोर…


नवी दिल्ली : एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दोन महिन्यांनंतर राष्ट्रीय तपास संस्थेला मोठं यश मिळाले आहे. या दोघांच्या चौकशीतून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

एनआयए अधिकाऱ्यांच्या मते, अटक केलेल्या आरोपींची ओळख पटली आहे. परवेझ अहमद जोधर, (बटकोट) आणि बशीर अहमद जोधर (हिल पार्क) हे दोघेही पहलगाम येथील रहिवासी आहेत.

पहलगाममध्ये लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरीक ठार झाले होते. तर, १६ जण जखमी झाले होते. पहलगाम येथील हल्ल्यापूर्वी दोघांनीही दहशतवाद्यांना अन्न, पेये आणि इतर रसद पुरवली होती.

हल्ल्यापूर्वी दोघांनीही दहशतवाद्यांना बैसरन मैदानाबद्दल माहिती दिली होती. या ठिकाणी पोलीस अथवा इतर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याची माहिती त्यांनी दिली होती, असे तपासात समोर आली.

दहशतवाद्यांनी त्यांना आपल्या कटात सहभागी करून घेतलं. पहलगाममधील हल्ल्यातील तीन दहशतवादी हे पाकिस्तानची नागरिक होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी होते.

अटक केलेले दोन्ही आरोपी फरार दहशतवाद्यांचे स्थानिक समर्थक असल्याचे एनआयएचे म्हणणे आहे. बैसरन मैदानात २६ निष्पाप लोकांना मारण्यापूर्वी दहशतवाद्यांना आश्रय या आरोपींनी दिला होता.

हल्ला करणारे दहशतवादी अजूनही फरार आहेत. या फरार दहशतवाद्यांचे हे स्थानिक समर्थक पकडले गेल्याने फरार दहशतवाद्यांचा ठावठिकाणा समजू शकेल असा अंदाज एनआयएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!