Bopdev Ghat Rape Case : आरोपी पुण्यात, बायको नागपूरात, दोघींशी अनैतिक संबंध; बोपदेव घाटातील आरोपीची भयंकर माहिती उघड..


Bopdev Ghat Rape Case : पुण्यातील बोपदेव घाटात काही दिवसांपुर्वी फिरण्यासाठी गेलेल्या तरूण, तरूणीला मारहाण करून त्यांच्याजवळ असलेल्या मौल्यवान वस्तू लुटून तरूणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता.

बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींनी दारू व गांजाचे सेवन केले होते, तसेच जीपीएस लोकेशन लपवण्यासाठी तिघांनीही मोबाइल ‘फ्लाइट मोड’वर टाकले होते, अशी धक्कादायक माहिती या प्रकरणाचा मास्टरमाइंड असलेल्या दुसऱ्या आरोपीच्या चौकशीत समोर आली आहे.

अख्तर शेख (वय २७, रा. नागपूर) असे अटक केलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. या आधी चंद्रकुमार रविप्रसाद कनोजिया (वय २०, रा. डंडी; मूळ रा. मध्य प्रदेश) याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. पोलिस या प्रकरणातील आणखी एका आरोपीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, अख्तर शेख या गुन्ह्यामागचा मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. त्याच्यावर यापूर्वी भिगवण येथे लूटमार व बलात्काराचा गुन्हा दाखल आहे; तसेच पुणे शहर व ग्रामीण आणि नांदेड परिसरात लुटमारीचे नऊ गुन्हे दाखल आहेत.

अख्तर शेख आपल्या साथीदारांसह मिळून निर्जनस्थळी लूटमार करायचा. त्याने यापूर्वीही लूटमार करताना अत्याचार केले होते. मात्र, पीडितांनी पोलिसांकडे तक्रार दाखल न केल्याने ती निर्ढावला होता, अशी माहिती अटक केलेल्या त्याच्या साथीदाराने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

मास्टरमाईंडचे दोघींशी अनैतिक संबंध…

बोपदेव घाटात तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर पोलिस आरोपींचा कसून शोध घेत होते. मात्र, तिन्ही आरोपी सलग तीन दिवस पुण्यातच फिरत होते, सात ऑक्टोबरला तिघेही एकत्र भेटले. त्यानंतर अख्तर शेख नागपूरला गेला. त्याची पत्नी नागपूरमध्ये राहते.

दोन महिलांसोबत त्याचे अनैतिक संबंध असून, त्यापैकी एक अमरावती येथे आणि दुसरी कोंढव्यात राहते, अख्तर शेख नागपुरात चार दिवस राहिला. पोलिसांनी चंद्रकुमारला अटक केल्यावर त्याने ११ ऑक्टोबर रोजी नागपूर सोडून प्रयागराजला धाव घेतली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!