अमिताभ बच्चन, धमेंद्र , मुकेश अंबानी यांची घरे ‘बॉम्ब’ ने उडविणार असल्याची दिली खबर ! मग काय, मुंबई पोलिसांनी लोणीकंद येथून एकाच्या मुसक्या आवळल्या…!
पुणे: ज्येष्ठ सिने अभिनेते अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांची घरे बॉम्बने उडवून देण्याची खोटी माहिती नियंत्रण कक्षाला देणाऱ्या महाभागाला लोणीकंद (ता. हवेली) येथून अटक करण्यात आली आहे.
राजेश कडके (वय-२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीने नागपूर पोलिस
नियंत्रण कक्षाला फोन करुन ही माहिती दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता.२८) दुपारी पावणे चारच्या सुमारास ”मुंबईतील शिवाजी पार्क येथे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’या मालिकेतील दिलीप जोशी यांच्या घरासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. यामध्ये २५ जणांकडे बंदुका आणि बॉम्ब असून ते मुकेश अंबानी, अमताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या घराजवळ स्फोट करुन शकतात.” असे त्याने पोलिसांना सांगितले होते.
याची माहिती नागपूर पोलिसांनी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला दिली होती. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, ही माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, मुंबई पोलिस तपास करीत असताना, पोलिसांनी फोन ट्रेस लोकेशन पुण्यात सापडले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी राजेश कडके याला लोणीकंद येथून अटक केली आहे. आरोपी राजेश कडके याने हा धमकीचा फोन का केला होता. याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास मुंबई पोलीस करीत आहेत.