मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर बॉम्ब ? सुरक्षा यंत्रणा तसेच बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल…!

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संबंधी महत्वाची माहिती समोर येतीय . योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थाना बाहेर बॉम्ब असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यांचदरम्यान संबंधित अफवा समोर आल्यानंतर तातडीने बॉम्ब शोधक आणि नाशक पथक आदित्यनाथ यांच्या निवास स्थानाबाहेर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री निवास स्थानाच्या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचं निवसस्थान परिसरात अतिशय बारकाईने आणि काटेकोरपणे शोध मोहिम सुरु आहे. पण बॉम्बचं वृत्त ही अफवाच होती, अशी प्राथमिक माहिती समोर येतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री निवास स्थानाबाहेर बॉम्ब असल्याचा फोन लखनऊ पोलिसांना आला होता. त्यानंतर तातडीने पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी तातडीने घटनेचं गांभीर्य ओळखत इतर सुरक्षा यंत्रणांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफोटा योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर दाखल झाला.