सहजपूर हद्दीत ‘परफेक इंजिन कंम्पोनेट ‘ कंपनीच्या बॉयलरने घेतला पेट ! जिवहीतहानी टळली मात्र कंपनीचे मोठे नुकसान…!
उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावरील सहजपूर (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील नांदूर या ठिकाणी असलेल्या परफेक इंजिन कम्पोनेस्ट या कंपनीत तीन बॉयलरला आग लावून कंपनीने मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणताही जिवितहानी पोहचली नाही.
कंपनीच्या बॉयलरला पेट घेऊन एकापाठोपाठ एक असे तीन बॉयलर आगीच्या चपेटात येऊन कंपनीच्या इतर साहित्यांनी पेट घेतला. काही कळताच आगीने इतर साहित्यांचा पेट घेतल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.या आगीत कंपनीने साठवून केलेल्या ऑइलचेही मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान सहजपूर ग्रामपंचायत हद्दीतील नांदूर या परिसरात परफेक इंजिन कम्पोनेस्ट ही इंजिन ऑईल तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीत विविध प्रकारचे इंजिन ऑईल तयार करण्यात येत आहे.
Views:
[jp_post_view]