नीरा नदीच्या पुलाखाली पोत्यात आढळला मृतदेह, पोतं उघडलं अन् पुणे जिल्हा हादरला..

पुणे : निरा नदीच्या पुलाखाली एका पोत्यात मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा गावच्या हद्दीत निरा नदीवरील पुलाखाली नदी पात्रात पोत्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. याबाबत माहिती होताच याठिकाणी अनेकांनी धाव घेतली.
३५ ते ४० वयोगटातील पुरुष जातीचा हातपाय बांधून पोऱ्यात भरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याठिकाणी राजगड पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. मयूर निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भोर येथील उपविभागीय रुग्णालयात पाठवला आहे. या मृतदेहाच्या गळ्यावर वण आहेत. यामुळे घातपात असल्याचे सांगितले जात आहे. तसेच उजव्या हातावर ओम कोरलेले आहे. याबाबत पोलिसांनी तपास केला आहे.
पुणे सातारा महामार्गावरील नसरापूरच्या राजगड पोलीसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून गळा दाबून खून केला असल्याचे सांगितले जात आहे. नानाची वाडी नावाचे हॉटेलच्या कडेस निरा नदीच्या पात्रात एक अनोळखी पुरूष जातीच्या सुमारे 30 ते 35 वर्षे वयाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली होती.
हा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचे हात व पाय बांधून त्यास पांढरे पिवळे व लाल रंगाचे प्लॅस्टिकच्या पोत्यात घालून निरा नदी पात्रात फेकून दिले आहे, अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी याठिकाणी तपास सुरू केला आहे.