हातकणंगलेतून विधानसभा लढलेल्या अजितदादांच्या शिलेदाराची विचित्र अवस्थेत बॉडी सापडली, पोलिसांना वेगळाच संशय..


कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. अनैतिक संबंधातून हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. काही संशयितांनी कोल्हापूर पोलिसांत हजर होत गुन्ह्याची कबुली दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावात हा प्रकार घडला. हा नेता ग्रामपंचायत सदस्य होता. लखन बेनाडे असे त्यांचे नाव होते. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते होते. त्यांच्या कारकीर्दीत अनेक विवादास्पद घटना आणि गुन्हे नोंदवले गेले होते. 2014 मध्ये हातकणंगले मतदारसंघातून विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली होती.

ग्रामपंचायत सदस्य असलेल्या 35 वर्षीय लखन अण्णासो बेनाडे यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला असून. त्यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत दोन तुकडे करुन कर्नाटकातील संकेश्वरजवळ हिरण्यकेशी नदीत फेकण्यात आला होता. लखन बेनाडे हे 9 जुलैपासून बेपत्ता होते. त्यांच्या बहिणीने 10 जुलै रोजी गावभाग पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती.

त्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह नदीत दोन तुकड्यांमध्ये आढळून आला. हा खून पाच ते सहा दिवसांपूर्वी झाला असावा. मारेकऱ्यांनी ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळून नदीत टाकल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांकडून हत्या, अनैतिक संबंध, घरगुती संघर्ष, आणि राजकीय वाद अशा सर्व शक्यतांचा अभ्यासपूर्वक तपास सुरू आहे.

दरम्यान, काही संशयितांनी कोल्हापूर पोलिसांत हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. तर पोलिसांनी या प्रकरणात पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती समोर आली आहे. हा खून पाच ते सहा दिवसांपूर्वी झाला असावा. मारेकऱ्यांनी ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळून नदीत टाकल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!