भीमा नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह अखेर सापडले; घटनेने अख्खं गाव हळहळलं


पुणे : कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील भीमा नदीत पोहण्यासाठी गेलेली दोन मुले पाण्यात बुडाल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. या मुलांचा शोध घेतला जात होता

खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचे संतुलन बिघडून बुडू लागल्याचे पाहत अनुराग मांदळे त्याच्या मदतीस गेला. असे असताना मात्र गौरव घाबरल्याने त्याने अनुरागला आवळून धरले. यामुळे दोघेही पाण्यात बुडाले.

गाव म्हणतंय दादा दारूबंदी करा, दादा म्हणाले मी शरद पवार सुप्रिया सुळे येतो आणि अजितदादांनी पोलिसांना सुनावलं

गौरव गुरुलिंग स्वामी (वय १६), अनुराग विजय मांदळे (वय १६) अशी त्यांची नावे आहेत. ही मुले कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील ढेरंगे वस्ती येथे राहण्यास होती. यामुळे घरच्यांना एकच धक्का बसला.

नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत! पुन्हा होणार भिर्रर्र, अटी मात्र लागू

दरम्यान, बाकीच्या मुलांनी आरडाओरडा केला असता शेजारील शेतकरी तानाजी ढेरंगे धावून आले सोबत स्वप्नील भोकरे, संपत भांडवलकर, बापू भांडवलकर, भाऊ अजगर, आदी ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यात उतरून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते घावले नाहीत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!