कुख्यात गुंड निलेश घायवळविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस, रवींद्र धंगेकर उतरले मैदानात; अडचणी वाढणार?


पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात लपून बसला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असूनही त्याचा कोणताच ठावठिकाणा लागलेला नाही.या प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. घायवळच्या विरोधात आता ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन म्हणजे इंटरपोलकडून घायवळ विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे निलेश घायवळ याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, निलेश घायवळ याने पासपोर्टसाठी अडनावात बदल केला आणि अहिल्यानगर येथून पासपोर्टसाठी अर्ज केल्याचे समोर आल्यानंतर त्यावरून राजकारण तापले आहे.आता,शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी याप्रकरणात भाजपविरोधात मोर्चा उघडला आहे. निलेश गायवळ ज्या पद्धतीने दादागिरी करतोय, त्याने खोटा पासपोर्ट केला आहे तसेचं लोकांचे मुडदे पाडले किंवा समीर पाटील असेल ही सर्व लोक चंद्रकांत पाटील यांच्या आसपास असतात. यामुळेच त्यांचं धाडस होत चालला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, समीर पाटील ज्यावेळेस पोलीस स्टेशन मध्ये जातो त्यावेळेस दादांच्या जवळचा असल्यामुळे तो पोलिसांवर दबाव टाकतो, असा दावा त्यांनी केला. गुन्हेगारीची सिस्टीम रन करताना समीर पाटील दिसत आहे. समीर पाटीलची माहिती घेतली असता त्याच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती चीटिंगचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर मोक्का सुद्धा आहे, असे रवींद्र धंगेकर म्हणाले. दरम्यान आता घायवळच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आल्याने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!