दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का! 13 जण फुटले, वेगळा पक्षही स्थापन केला, झाला महाराष्ट्र पॅटर्न….


नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी झालेल्या दिल्ली विधानसभेची सत्ता गेल्यानंतर आता अरविंद केजरीवालांच्या आप पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. यामुळे आगामी काळात दिल्लीतील राजकीय परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. दिल्ली महापालिकेमध्ये 13 नगरसेवकांनी आप पक्षाला सोडचिठ्ठी देत वेगळा गट तयार केला आहे.

याबाबत माहिती अशी की, हेमचंद गोयल यांच्या नेतृत्वाकाली 13 जणांनी आप पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत इद्रप्रस्थ विकास पार्टी नावाने वेगळा गट तयार केला आहे. मुकेश गोयल हे या पक्षाचे नवे नेते असतील. यामुळे आता आम आदमी पक्षाचे नगरसेवकांची संख्या कमी होणार आहे.

एमसीडी निवडणुकामध्ये भाजपचे इक्बाल सिंह हे महापौर बनले होते. त्यांनी काँग्रेसच्या मनदीप सिंह यांचा पराभव केला होता. या निवडणुकीवर आपच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता. तेव्हापासून नगरसेवक नाराज झाले होते. यामुळे 13 नगरसेवकांनी आपचा राजीनामा देत वेगळा गट तयार केला आहे.

आपच्या अरविंद केजरीवाल यांच्यासमोर हे मोठं आव्हान असल्याचे सांगितले जात आहे.  मुकेश गोयल यांनी आप पक्षाकडून आदर्श नगर विधानसभा निवडणूकही लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून याबाबत चर्चा सुरू झाली होती. सध्या नगरसेवकांनी राजीनामा देत वेगळा गट निर्माण केल्यानतंर एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!