पुण्यात मध्यरात्री रक्तरंजित थरार ; तरुणाला चौघांनी घेरलं अन धारदार शस्त्रांनी सपासप वार..

पुणे : गेल्या काही दिवसांपासून विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेले पुणे गुन्हेगारी घटनांमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. अशातच आता पुण्यात मध्यरात्री भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला चौघांनी घेरून त्यातील दोन जणांनी तीक्ष्ण हत्यारांनी वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरात मोबाईल गेम खेळत होता. याच वेळी दुचाकीवरून आलेल्या चार पैकी दोन जणांनी तरुणावर प्राणघातक हल्ला केला. यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते. पण पोलिसांनी दोन्ही आरोपींसह त्यांच्यासोबत असलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.करण शिवाजी जमादार (वय १९. रा. सिंहगड महाविद्यालयाजवळ, वडगाव बुद्रुक), शुभम साधू चव्हाण (वय १९, रा. रियांश सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत जखमी तरुणाच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
दरम्यान या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्या तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. हल्लेखोरांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली आहे.
