निवडणूक काळात नोटबंदीची नाकाबंदी सुरू! शिरूर पोलिसांनी पकडली ५१ लाखांची रोकड
शिरूर : २०२४ लोकसभा निवडणुकीच्या काळात शिरूर जवळ सतरा कमान पुलाजवळ पुणे व अहमदनगर हद्दीला लागून तपासणी नाका पोलिसांनी उभारला असून या ठिकाणी दररोज तपासणी केली जात आहे. रात्री शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत पोलिसांनी नाकाबंदी तपासणीत सुमारे ५१ लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत तपासणी तसेच नाकाबंदी केली जात आहे. शिरूर जवळ सतरा कमान पुलाजवळ पुणे व अहमदनगर हद्दीला लागून तपासणी नाका पोलिसांनी उभारला आहे. या ठिकाणी दररोज तपासणी केली जात आहे.
दरम्यान शिरूर पोलिस नियमित वाहन तपासणी करत असताना पुणे नगर महामार्गावर आलेल्या आलिशान वाहनात पोलिसांनी तपासणी केली असता, रोख रक्कम मिळून आली आहे.
याबाबत रात्री सदर वाहनमालकाची रात्री उशिरापर्यंत निवडणूक अधिकारी, पोलिस अधिकारी कसून चौकशी करत होते. याबाबत उशिरापर्यंत नेमकी माहिती मिळू शकली नाही. दरम्यान शिरूर पोलिसांनी ताब्यात घेतलेले वाहन एका व्यावसायिकाची असल्याची चर्चा शिरूर परिसरात सुरू होती.