धार्मिक क्षेत्राला काळीमा! खरात प्रकरणानंतर नांदेडच्या संत बाबाचा कारनामा उघड, 47 वर्षीय महिलेवर बलात्कार..


पुणे : नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात यांच्यावर अत्याचाराची गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढत असतानाच आता नांदेड मधून धार्मिक क्षेत्राला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. ज्याला ‘गुरू’ मानून श्रद्धेने शरण गेले, त्याच नराधम महाराजााने एका 46 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,शहरातील गाडीपुरा भागातील एका मठाचा मठाधिपती 39 वर्षीय हरिगिरी दत्तगिरी महाराज याने एका 46 वर्षीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने या छळाला कंटाळून धाडस दाखवत पोलीस ठाणे गाठले, ज्यानंतर भाग्यनगर पोलिसांनी या भोंदू महाराजाला बेड्या ठोकल्या आहेत.

तक्रारीनुसार आरोपीने महिलेला विश्वासात घेत तिच्याशी जवळीक वाढवली. वाढदिवसाच्या निमित्ताने तिला घरी येण्याचा आग्रह करत त्याने तिच्यावर दबाव टाकला.पुढे लग्नाची आश्वासन देत तिच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

मात्र, जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा मी संन्यासी असल्याने लग्न करू शकत नाही, असे म्हणत त्याने हात झटकले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली.

पीडितेच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी हरिगिरी दत्तगिरी महाराजाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याला तात्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे नांदेडमधील भक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!